पांढर्‍या केसांसाठी कांद्याचा रस आहे अत्यंत फायदेशीर आहे, एका आठवड्यात दिसून येईल फरक…!

पांढर्‍या केसांसाठी कांद्याचा रस आहे अत्यंत फायदेशीर आहे, एका आठवड्यात दिसून येईल फरक…!

केसांच्या समस्या सातत्याने वाढत आहेत. वास्तविक, बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही यामागची प्रमुख कारणे आहेत. अशा स्थितीत केस अकाली पांढरे होणे, वाढ न होणे आणि तुटणे अशी समस्या लोकांमध्ये दिसून येते. सर्व प्रकारचे उपाय करूनही तुमची समस्या दूर होत नसेल तर तुम्ही एकदा कांद्याचा रस नक्की करून बघा. तुमच्या केसांना याचा नक्कीच फायदा होईल.

कांद्याच्या रसाने केसांना मसाज करा : कांद्याच्या रसाने केसांच्या टाळूला स्क्रब आणि तेल लावल्याने केस स्वच्छ होतात आणि रक्ताभिसरण वाढते. टाळू स्वच्छ असल्यामुळे कोंडा होण्याची समस्या नसते आणि स्वच्छ छिद्रांमुळे त्यामध्ये धूळ किंवा बुरशी आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होणार नाही. कांद्याचा रस हा केसांची वाढ होण्यासाठी मदत करतो

केसांची वाढ वाढवण्यासाठी असो किंवा त्यांना घट्ट करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर आहे. त्याचा रस कोणत्याही तेलाने केसांना लावून मसाज करू शकता. यामुळे आठवडाभरात तुम्हाला फरक दिसेल.

अशा प्रकारे कांद्याचा रस तयार करा

प्रथम कांदा किसून त्याचा रस काढा किंवा तुम्ही कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढू शकता. त्यानंतर या रसात लिंबाचा रस मिसळावा. यानंतर, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मधील तेल मिश्रणात टाका. आता हे स्प्रे बाटलीत घालून केसांना लावू शकता.

beingmarathi

Related articles