टिपू सुलतान नेमका कसा होता, एक क्रूर शासक की सहिष्णू राज्यकर्ता?

टिपू सुलतान नेमका कसा होता, एक क्रूर शासक की सहिष्णू राज्यकर्ता?

गेल्या काही वर्षांपासून इतिहासकारांचा एक विशिष्ट गट टिपू सुलतान यांना एक क्रूर शासक व हिंदूंचा नायनाट करणारा मुस्लिम सुलतान म्हणून दर्शवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. हिंदूंचा नाश करणारा एक शासक म्हणून टिपू सुलतान ची प्रतिमा उभी केली जात आहे.या गोष्टीचा अनेकदा राजकीय अजेंडा म्हणूनही वापर केला जातो. गेल्या वेळच्या कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये सुद्धा टिपू सुलतान हा एक सहिष्णु राज्यकर्ता होता कि हिंदूंचा दुश्मन होता यावरून चर्चा झडल्या होत्या.

टिपू सुलतान आज या जगात नसला तरीही त्याच्या काळामध्ये त्याने वसवलेली श्रीरंगपट्टणम ही राजधानी आजही त्याच्या काळातील वास्तू शास्त्र व स्थापत्यशास्त्र मधून आपल्याला त्याची झलक देते. श्रीरंगपट्टनम मध्ये एका मकब-यात टिपू सुलतान ची कबर आहे.

राजकीय मतप्रवाह मध्ये टिपूच्या भूमिकेबद्दल नेहमीच मतभेद दिसून येतात. मात्र सर्वसामान्य जनता आजही टिपू सुलतान ला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा लढवय्या म्हणूनच ओळखते.यापूर्वी कर्नाटक मध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने टिपूला इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या ज्या मोजक्या व्यक्तींची नावे घेतली होती त्यामध्ये मानाचे स्थान दिले होते. या सर्व घडामोडींना भारतीय जनता पक्ष काँग्रेस कडून मुसलमानांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न मानते. भारतीय जनता पक्षाच्या मते टिपू सुलतान हा कधीही देशभक्त नव्हता तर त्याने अनेक हिंदूंची हत्या केली आहे. यामुळे तो हिंदू धर्माचा शत्रू म्हणूनच गणला गेला पाहिजे.

टिपु सुलतान च्या साम्राज्य मध्ये धर्म सहिष्णुता व धार्मिक श्रद्धांचे पालन करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य होते. टिपू सुलतान ने आपल्या काळामध्ये म्हैसूर व अन्य काही ठिकाणी अनेक मंदिरे बांधली तसेच मंदिराच्या बांधकामासाठी देणगी सुद्धा दिल्या. टिपू सुलतान च्या महालापासून काही अंतरावर एक मंदिर आज सुद्धा आपल्याला दिसून येते.

अनेक बुद्धिजीवी लोक टिपू सुलतान ला एक सर्वसमावेशक असा शासक मानण्यास तयार नाही. त्यांच्या मते टिपू सुलतान हा एक हुशार व धूर्त शासक होता. त्याने आपल्या राज्यामध्ये बंडाळी होऊ नये म्हणून नेहमीच हिंदूंशी सहिष्णू धोरण स्वीकारले. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार केले नाही वा हिंदुंच्या धर्म स्थळांना इजा पोहोचवली नाही मात्र केरळ आणि मलबार च्या किनार्‍यालगत त्याने अनेक हिंदूंचे शिरकाण केले. तो मूर्तिपूजकांच्या विरोधात होता.टिपू सुलतान चा मुळ स्वभाव हा जिहादी स्वरूपाचा होता व  त्याने अनेक हिंदूंना मुस्लीम धर्मात परावर्तित करण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध इतिहासकार रवी वर्मा यांनी असे सांगितले आहे की त्या काळी उपलब्ध असलेल्या दस्तऐवज मधून व हस्तलिखितांमधून असे प्रतीत होते की टिपू सुलतान हा एक पक्षपाती शासक होता. त्याने आखलेले किनाऱ्यालगतचे सैन्य अभियान हे त्या ठिकाणी असलेल्या हिंदूंना नष्ट करणे व हिंदूंच्या मंदिरांना इजा पोहोचवणे यांना प्राधान्य देणारे होते. याला प्रमाण म्हणून रवी वर्मा यांनी टिपू सुलतान ने आपल्या सैन्याच्या मदतीने नष्ट केलेल्या हिंदू मंदिरांच्या नावांची सूची तयार केली आहे.

या प्रसिद्ध इतिहासकारांच्या दाव्यांना खोडून टाकणारे विचारप्रवाह सुद्धा अस्तित्वात आहेत. त्यांच्या मते टिपू सुलतान ची एक क्रूर शासक म्हणून असलेली छबी ही भूतकाळ पेक्षा वर्तमानातील राजकीय परिस्थितीनुसार निर्माण झालेली आहे. या मातीमध्ये राज्य करणारा प्रत्येक सत्ताधीश आपल्या सोयीनुसार इतिहास बनवण्याचा प्रयत्न करतो व आज घडीला हिंदू विरोधी अशी जी टिपू सुलतान ची प्रतिमा केली जात आहे ती सुद्धा याच विचारसरणीचा भाग आहे असे टिपू सुलतान च्या बाजूने उभे राहणाऱ्या बुद्धिजीवी यांना वाटते.

beingmarathi

Related articles