झाडू वापरताना घ्या या गोष्टींची काळजी नाहीतर होईल खूप मोठा अनर्थ

झाडू अर्थाथच लक्ष्मी. आपण झाडूला लक्ष्मी मानतो. लक्ष्मीपूजन करताना आपण झाडूला लक्ष्मीची उपमा देतो आणि पूजा करतो. आपण रोज घरात दोन वेळेस जादू लावतो. सकाळी आणि संध्याकाळी. पण झाडू लावताना आपण पुढील गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
झाडू घरात किंवा ऑफिसमध्ये उभे करून ठेऊ नका. यामुळे तुमच्या घरातील धन संपती कमी होते.झाडू नेहमी जामिनावर सरळ ठेवलेला असावा.जर तुम्ही असे केले तर तुमच्या खिशातील बँक बॅलेन्स कमी होणार नाही.
रोज दिवे लागण्याच्या वेळेस घरात किंवा दुकानात झाडू लावू नये. घरातील लक्ष्मी निघून जाते असे देखील म्हटले जाते. आणि जर झाडू लावणे गरजेचे असेल तर कमीत – कमी कचरा काढावा. कचराघरच्या बाहेर फेकु नये. झाडू शक्यतो पश्चिम दिशेस ठेवावा त्यामुळे घराती नकारात्मक वातावरण देखील कमी होते.
झाडूला शक्यतोपाय लागू नये. कारण झाडूमध्ये लक्ष्मी असते असे म्हटले जाते. जर तुम्ही नवीन झाडू वापरणार असाल तर शक्यतो दर शनिवारी नवीन झाडू वापरावा. असे देखील म्हटले जाते की झाडू घरातील सर्व नकारात्मकता काढून टाकते. त्यामुळे झाडूला एक वेगळेच महत्व आहे.