Loading...

देशातील आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर हे निरनिराळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या झगमगाटाला रंगीबिरंगी मायाजालाला भुलून अधिकाधिक पैसा कमावणे, उंची राहणीमान मिळवणे, प्रसिद्धी मिळवणे अशा महत्वकांक्षा मनाशी बाळगून दरदिवशी हजारो तरुण-तरुणी मुंबईच्या गर्दीमध्ये सामील होतात. मात्र मुंबईच्या रंगीबेरंगी झगमगाटाच्या पलीकडे एक काळी भयाण वास्तवदर्शी दुनिया अगदी मुंबईच्या मध्यभागी वसली आहे. मुंबईतील बॉलिवूड निरनिराळे उद्योग, व्यवसाय, एक्टर्स लोकांची टोलेजंग घर यासोबतच मानवी तस्करीचा केंद्रबिंदू असलेले कामाठीपुरा हेसुद्धा एका अर्थाने संपूर्ण जगभरात देहविक्रयासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. या दुनिये मध्ये कधी स्वेच्छेने तर कधी मजबुरीने तर कधी  फसगतीने प्रवेश केलेल्या मुलींवर होणाऱ्या अनन्वित अत्याचारांची कहाणी प्रसारमाध्यमांद्वारे ,स्वयंसेवी संस्थांच्या अहवालाद्वारे व कित्येकदा मांडण्यात आली आहे .एक संवेदनशील व्यक्ती म्हणून या अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांचे वर्णन नक्कीच हृदय हेलावून टाकणारे आहे.

Loading...

कामाठीपुरा हे 1864 साली मुख्यत्वे ब्रिटीश व युरोपियन अधिकाऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी युरोपियन खंडातील मानवी तस्करी द्वारे वेश्यांना आणण्याचे मध्यवर्ती केंद्र बनले होते .त्याकाळी याठिकाणी काही स्थानिक भारतीय पुरुष सुद्धा जात असत .ब्रिटिशांचे भारतावरील राज्य संपल्यानंतर भारतीय वेश्या कामाठीपुरा मध्ये वसाहती करून राहू लागल्या. सध्याच्या कामाठीपुराची स्थिती अशी आहे की येथे वेश्यांना बसण्याची  सुद्धा जागा उपलब्ध नाही त्यामुळे गर्दीमध्ये गिऱ्हाइकांना हेरुन भाड्याने काही तासांकरता पलंग घेऊन आपली कमाई त्या करतात. त्याठिकाणी स्वच्छतेच्या कोणत्याही मूलभूत सोयी उपलब्ध नाहीत.

Loading...

भारतामध्ये सध्या मुख्यत्वे भारत-बांगलादेश सीमेवरील मुली, नेपाळमधील मुली ,यांची कामाठीपुरा तील वेश्या व्यवसायासाठी तस्करी करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतात  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व ईशान्य भारत भागातील अल्पवयीन मुलींना ही मानवी तस्करीसाठी निरनिराळ्या प्रकारची प्रलोभने दाखवून जाळ्यात अडकवले जाते .मानवी तस्करांचे प्रमुख भक्ष्य हे भारत-बांगलादेश आणि नेपाळच्या सीमेवरील गरीब घरातील मुली असतात. या मुलींना चांगल्या नोकरीची व चांगल्या पगाराचे आमिष दाखवून बोलवले जाते .मुंबईतील कामाठीपुरा मध्ये आणल्यानंतर त्यांना सुरुवातीला नशेचे इंजेक्शन देऊन व्यसनाच्या आहारी पाडले जाते.

Loading...

वास्तवाची जाणीव झाल्यावर जेव्हा मुली पुन्हा घरी परत जाण्याची भाषा करू लागतात तेव्हा त्यांना खोलीत कैद केले जाते. जोपर्यंत त्या वेश्याव्यवसायासाठी तयार होत नाही तोपर्यंत त्यांना अन्न-पाण्यावाचून ठेवले जाते. अमानवी पद्धतीने त्त्यांना मारहाण केली जाते त्यांच्यावर बलात्कार केला जातो.  जेव्हा परिस्थितीपुढे हतबल होऊन त्या वेशाव्यवसायासाठी त्या तयार होतात तोपर्यंत त्या व्यसनाच्याइतक्या आहारी गेलेल्या असतात की ते मिळवण्यासाठी वेश्याव्यवसायाचा मार्ग पत्करतात .प्रेरणा या कामाठीपुरा तेल वेश्यांसाठी  काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार कामाठीपुरा तील अत्याचार हे निश्चितच मानवजातीला काळीमा फासणारे आहेत. आशिया खंडात सर्वात जास्त मानवी तस्करी केली जाते असेही जागतिक सर्वेक्षणाद्वारे नमूद करण्यात आले आहे.

Loading...

अपहरण करून वेश्याव्यवसायाला  प्रवृत्त करण्यात आलेल्या मुलींमध्ये 12 ते 17 वर्षे वय असलेल्या मुलींचे प्रमाण जास्त आहे. या वया मधील मुलींना ग्राहकांकडून जास्त मागणी असते .त्यामुळे वेश्याव्यवसायातील साखळी कडून या मुलींची वर्जिनिटी विकण्यासाठी जणूकाही स्पर्धा लागलेली असते. अनैसर्गिक पणे या मुलींच्या अवयवांना विकसित केले जाते याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. या अल्पवयीन मुलींना बऱ्याचदा कोणत्याही सुरक्षितते शिवाय केल्या गेलेल्या गर्भपातांना सामोरे जावे लागते त्यामुळे त्या आयुष्यात पुढे कधीही गर्भधारणा करू शकत नाही. ग्राहकांकडून जणू काही एखादे खेळणे असल्याप्रमाणे

Loading...

त्यांच्यावर कोवळ्या वयात अत्याचार केले जातात अगदी लहान वयातच यापैकी कित्येक मुलींना लैंगिक आजार एच आय व्ही सारख्या आजारांना बळी पडावे लागते.

अत्याचारांच्या दलदली मधून सुटका करून घेण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून काही मुली आत्महत्येचा पर्यायही स्वीकारताना दिसतात.

Loading...