लता मंगेशकर यांच्या पश्चात ‘हे’ असणार त्यांच्या संपत्तीचे वारसदार…

गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचे सहा फेब्रुवारी रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू ही संपूर्ण जगभरामध्ये पसरली होती यामुळे त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी राजकारण,समाजकारण,चित्रपट क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.भारताचे पंतप्रधान हे लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई येथे आले होते.
लता मंगेशकर यांनी तब्बल सात दशके विविध भाषांमधील गाणी गायली आहेत.तीस हजारांहून अधिक गाणी लता मंगेशकर यांनी गायलेली आहेत तर 36 भाषांतील गाणे गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.खूप लहान वयामध्ये वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी लता दिदींवर आली.पहिल्या गाण्यासाठी त्यांनी 25 रुपये इतके मानधन घेतले होते.तृयांनी महल या चित्रपटातील गाणे गायले होते.
यानंतर लता मंगेशकर यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली.त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय लतादीदींनी घेतला.त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण याबद्दल ही काही चर्चा रंगत आहेत.आपल्या संपूर्ण कारकिर्दीत लताजींना पैसा व प्रसिद्धी दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात मिळाले.
त्या आपल्या पश्चात 370 कोटी रुपये इतक्या मूल्यांची संपत्ती सोडून गेल्या आहेत.लता मंगेशकर यांचे पेडर रोडवर अतिशय आलिशान असे घर आहे.लतादीदी यांना रॉयल्टी निवेश यामार्फत मानधन मिळत असे.लतादीदींनी आजपर्यंत अनेक चित्रपटांची गाणी गायली.या चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शकांनी सन्मानाचे प्रतीक म्हणून अनेक महागडी वस्तू या भेट वस्तू म्हणून दिल्या.वीर झारा या चित्रपटामध्ये गाणी गायल्यानंतर यश चोप्रा यांनी लताजींना मर्सिडीज ही आलिशान गाडी भेट म्हणून दिली होती.
त्यांच्या संग्रहामध्ये खूप अलिशान गाड्या व अनेक महागड्या भेटवस्तू सुद्धा आहेत.त्यांना दर वर्षी सहा कोटी रुपये इतके मानधन मिळत असे.त्यांनी विवाह न केल्यामुळे त्यांच्या पश्चात वारसदार कोण हा प्रश्नही उपस्थित होतो.लतादीदी अखेरपर्यंत आपल्या बहिण भावंडांसोबत राहिल्या.त्यांचे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.यामुळे लताजींची संपत्तीही त्यांच्या भावाला मिळणार की बहिणीला हे तर येणारा काळच ठरवेल.