Articles News

व्हाटस अँपवरुन बोलवली काँलगर्ल, समोर आली तर ती निघाली पत्नी, मग जे घडलं ते बघून तुमचे होश उडतील

Sharing is caring!

 आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच मानवी संबंधांमधील गुंतागुंतसुद्धा वाढून अनेक समस्या निर्माण होत आहेत व एक प्रकारचा दुरावा हा विशेषतः वैवाहिक नात्यांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी एकमेकांसोबत सात जन्म जोडीदार म्हणून एकत्र राहण्याची वचने घेऊन ती निभावणाऱ्या पिढ्या सध्या लोप पावत आहेत व आपल्या जोडीदारासोबत काही छोट्या-मोठ्या गोष्टींवरून खटके उडाले की ते नाते संपुष्टात आणण्याची वृत्ती वाढत आहे व यातूनच काही अनैतिक संबंधांना सुद्धा प्रोत्साहन मिळत आहे.

या सर्व अनैतिक प्रकारांमधून निश्चितच खूप मनस्ताप हा दुसऱ्या जोडीदाराला होतो.सध्या अनेक अतार्किक व अजब प्रकार वैवाहिक संबंधांमध्ये घडल्याचे दिसून येते व यापैकी काही प्रकरणे ही अक्षरशः पोलिस ठाण्यापर्यंत जातात व या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर पोलिसांना सुद्धा डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येते .

पतीने पत्नीला धडा शिकवण्यासाठी व्हाट्सअप वरून कॉल गर्ल ची मागणी केली असता जर कॉल गर्ल म्हणून त्याची पत्नी समोर आली तर काय घडेल ?अगदी अशीच घटना सध्या उत्तराखंड येथील काशीपूर येथे घडली असून हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असून याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

 काही दिवसांपूर्वी काशीपूर येथील संबंधित युवतीने दिनेशपुर येथे राहत असलेल्या एका युवकासोबत विवाह केला मात्र विवाहानंतर ही तिने सासरी राहण्याऐवजी माहेरी राहणे पसंत केले. यामुळे संबंधित युवक त्रस्त होता व त्याला आपल्या पत्नीला घरी घेऊन येण्याची प्रचंड इच्छा होती मात्र यासाठी पत्नी तयार होत नव्हती. नेमके या मागचे कारण काय आहे याचा छडा हा युवक लावत होता.

यादरम्यान संबंधित तरुणीची एक अतिशय चांगली मैत्रीण होती.या तरुणीचा तिच्यासोबत वाद झाला.यावर या मैत्रीणीने  लग्नाअगोदर संबंधित तरुणी काँलगर्लचे काम करत होती असे सांगितले आणि सध्याही एका महिला दलालाच्या माध्यमातून ती हा  व्यवसाय करत आहे असे तिने सांगितले. या मैत्रीणीने त्या महिला दलालाचा व्हाटस अँप क्रमांकही पुरवला.या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या उद्देशाने या पतीने   दलाल महिलेला व्हाट्सअप द्वारे संपर्क केला व तिच्याकडे कॉल गर्ल ची मागणी केली.

यावर या महिलेने संबंधित तरुणाला तिच्याकडे उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या महिलांचे फोटो पुरवले यामध्ये या तरूणाच्या पत्नीचा फोटो होता.तरुणाने महिला दलाला द्वारे आपल्या पत्नीचे मागणी केली व ज्यावेळी त्याची पत्नी कॉल गर्लच्या रुपात त्याच्या दारासमोर उभी राहिली व दोघांची नजरानजर झाली त्यावेळी एकच गदारोळ उडाला. या दोघांनी एकमेकांना मारहाण केली व हे प्रकरण पोलिस स्थानकामध्ये गेले.

त्यावेळी पतीने आपली पत्नी  आपल्याला फसवून देहविक्रय व्यवसाय करत असल्याचा आरोप केला तर पत्नीने आपल्या पतीचे आपल्या मैत्रिणीसोबत विवाहबाह्य संबंध असून  त्यांने आपले शोषण केल्यामुळे आपण वेगळे राहात असल्याचा आरोप या तरूणावर केला.या प्रकरणाची पोलीस पुढील शहानिशा पोलीस अधिक तपासाद्वारे करत आहेत मात्र सध्या या प्रकरणा मुळे सध्याच्या नात्यांमधील पोकळपणा तर समोर आलाच मात्र सोशल मिडीयावर लोकांची करमणूकही चांगलीच झाली.