एकेकाळी तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या टिकटॉक या म्युझिक व्हिडीओ ऍपवरील प्रसिद्ध टिकटॉक स्टार समीर गायकवाडचे नि ध न झाले आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. ऐन तारुण्यात समीरने अशा प्रकारे एक्झिट घेतल्याने तरुणाईतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

समीरचे नि ध न हदयविकाराच्या झटक्यामुळे झाले असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर समीरचे लाखोंच्या घरात चाहते होते.

म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. समीर हा मूळचा पुण्यातील वाघोली येथील रहिवासी होता. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता.