भारतीय रेल्वे बद्दल अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या फक्त काहीच लोकांना माहित आहेत ? जाणून घ्या
भारतीय रेल्वे बद्दल अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या फक्त काहीच लोकांना माहित आहेत ? जाणून घ्या
भारतीय रेल्वे सेवेला खूप मोठा इतिहास आहे. इग्रजांच्या काळापासून भारतीय रेल्वे आपल्या सर्वांच्याच सेवेत आहे. भारतीय रेल्वेने आपले नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही दर्शविले आहे. जाणून घ्या अश्याच भारतीय रेल्वे अंतर्गत माहित नसलेल्या काही वस्तुस्थिती .
आपण आपली कार कितीवेळा गैरेज मेक्यानिक कडे नेतो? जर ठीक-ठाक गाडी चालत असेल तर सर्विसिंग पुरते 4 महिन्यातून एकदा, नाहीतर जेमतेम वर्षभराने एकदा. परंतु आपण ज्या ट्रेन मध्ये चढतो त्या ट्रेनला प्रत्येक प्रवासासाठी एक फिटनेस सर्टिफिकेट देले जाते. हे फिटनेस जो इंजिनियर देतो त्याला ट्रेन इंजीनियर म्हणले जायचे – (थोडक्यात TXR TRAIN EXAMINER)
- या फिटनेस सर्टिफिकेट शिवाय कोणतीही ट्रेन चालू शकत नाही.
तुम्ही कामाख्या चे नाव ऐकले आहे का? बऱ्याच लोकांनी हे ऐकले असेल कि हे आसामची राजधानी गुवाहाटी जवळ आहे. पण किती लोक तिथे गेले आहेत? माहितीनुसार खूप कमी लोक तिथे गेले आहेत. पण उद्या अचानाक आपल्याला तिकडे आपल्या कारने जावे लागले तर काय कराल? कार व्यवस्थित असेल तर सरळ निघायचे . यात काय विचार करायचं ?? परंतु ट्रेन ड्रायवरला हा विचार करावा लागतो. कोणताही ट्रेन ड्रायव्हर अश्या रेलखंडात नाही जाऊ शकत जेथे तो मागच्या तीन महिन्यात गेला नसेल . ह्याला रोड लर्निंग असे म्हणतात. जर त्या रेलखंडात तो 3 महिन्यात गेला नसेल तर त्याचे रोड लर्निंग समाप्त मानले जाते. सुट्टी किंवा ट्रेनिंग या कारणांमुळे सहसा अशी परिस्थिती उद्भवते . तेव्हा ड्रायव्हर कोणतीही ट्रेन चालवू शकत नाही आणि ट्रेन चालवायची असल्यास पुन्हा रोड लर्निंग प्राप्त करावे लागते . यासाठी त्याला इतर ड्रायव्हर सोबत कमीत कमी 4 दिवस आणि 2 रात्र असा ईंजिननी प्रवास करावा लागतो .
- तो ड्रायव्हर रोड लर्निंग शिवाय ट्रेन चालवू शकत नाही .
- ड्रायव्हिंग लायसन्स सारखेच ड्रायव्हरला सुद्धा compentency सर्टिफिकेट घ्यावे लागते , ज्याच्या शिवाय त्यांना ट्रेन चालवण्यास परवानगी नसते .
हे सर्टिफिकेट त्यांच्या यांत्रिकी / रेल्वेच्या वि्द्यूत विभागातील अधिकाऱ्यांद्वारे दिले जाते .
प्रत्येक ट्रिप सुरू करण्यापूर्वी ड्रायव्हर आणि गार्ड त्यांचे घड्याळ जोडतात जेणेकरून ते दोघेएकच वेळ लिहू शकतील . प्रत्येक प्रवासाची समाप्ती झाल्यानंतर त्या दोघांनाही त्यांच्या संयुक्त स्वाक्षर्यावर कंबाइन ट्रेन रिपोर्ट (सीटीआर) नावाचा अहवाल सादर करावा लागतो.
मालगाडीचे अचूक वजन घेण्यासाठी एक वजन काटा असतो (Weight bridge) परंतु प्रवासी ट्रेन मध्ये चढल्यानंतर अशी कोणतीही व्यवस्था नाही , त्याचे कारण असे कि असा विश्वास आहे की गाडीमध्ये जास्त ओव्हरलोडिंग होऊ शकत नाही.

- परंतु सामान्य श्रेणीच्या (GS) काही डब्यांमधील स्प्रिंग तुटण्याचे कारण हे overloading ठरले. त्यानंतर त्या स्प्रिंग चे डिझाईन बदलले गेले व त्याला अजून मजबूत बनवले. पण अजूनही प्रवासी गाडीच्या सामान्य डब्यांचे व पार्सल वॅन overloading ची तपासणी TXR ट्रेन एगझामीनर visual inspection द्वारा करतो ज्याने स्प्रिंग किती दाबलेली आहे हे लक्षात येते.

- अपघाताला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक २०० किमीवर रेल्वेमध्ये अपघात निवारण एआरटीची (accident relief train ART) व्यवस्था केली जाते. अपघाताची बातमी समजताच सायरन वाजविला जातो आणि सायरन वाजल्यापासून २० ते २५ मिनिटांत सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना ट्रेन पाशी पोहोचावे लागते कारण सायरन वाजल्यापासून २५ ते ३० मिनिटांच्या आत अपघातग्रस्त एआरटी (accident relief train ART) उघडले जाते व जे लोक मागे राहिले आहेत त्यांच्यावर अनुशासात्म्क कारवाई केली जाते .

- भारतीय रेल्वेकडे एकूण जमीन आहेः ४६१४८७ हेक्टर किंवा ११.४ लाख एकर / एकर किंवा ४६१४. चौरस किलोमीटर
याचा अंदाज घ्या: जर जमिनीचा तुकडा 1 किलोमीटर लांबीचा असेल तर तो 4614 किलोमीटरच्या अंतरावर पसरला जाईल, म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारीच्या अंतरापेक्षा 1000 किलोमीटर जास्त.
हे मॉरीशस, मालदीव, माल्टा, लक्झेंबर्ग, बहरेन यासह जगातील 30 देशांच्या क्षेत्रापेक्षा अधिक आहे.