मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात महाआघाडीच्या सरकार येणे नक्की झाले आहे. त्यानुसार उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य दोन दिग्गज नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव नक्की झाले असून ते उद्या आपल्या पदाची शपथ घेणार आहेत.

उद्धव ठाकरे हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याआधी देखील दिली होती. त्यामुळे आता उद्या विधानसभेत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, यासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.