चित्रपटाच्या सेटवरच क्लीन बोल्ड झाल्या ‘या’ ७ जोड्या, नंतर केलं लग्न.., ७ व्या जोडीची लव स्टोरी तर खूपच रंजक..!

चित्रपटाच्या सेटवरच क्लीन बोल्ड झाल्या ‘या’ ७ जोड्या, नंतर केलं लग्न.., ७ व्या जोडीची लव स्टोरी तर खूपच रंजक..!

बॉलीवुड मधील प्रेम कहाण्यांचा चाहतावर्ग देशाप्रमाणेच विदेशामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. मोठ्या पडद्यावर जेव्हा हीरो हीरोइन एकमेकांवर प्रेम करताना दिसतात तेव्हा तो केवळ अभिनय असतो मात्र काही काहीवेळा हा आँन स्क्रीन रंगलेला रोमान्स प्रत्यक्षामध्ये सुद्धा सुरू होतो.बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेम कहाण्या आहेत ज्या बॉलिवूड च्या सेटवर सुरू झाल्या व यामधील काही प्रेम कहाण्या विवाहामध्ये रूपांतरित झाल्या तर काही अधू-याच राहिल्या. बॉलीवूडच्या सेटने अशा अनेक नात्यांना खुलताना व मोडतांना सुद्धा पाहिले आहे. आज आपण अशाच काही जोडयांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्या प्रेमाची सुरुवात ही चित्रपटाच्या सेटवर झाली व पुढे जाऊन त्यांनी एकमेकांसोबत संसार सुद्धा सुरू केला.

 १) बी-टाऊन मधील  सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणजे सौंदर्यवती ऐश्वर्या राय आणि बच्चन घराण्याचा सुपुत्र व अभिनेता अभिषेक बच्चन होय.अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे .बंटी और बबली या 2005 साली आलेल्या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने कजरा रे या  धुमाकूळ घातलेल्या गाण्यावर ठेका धरला होता. या गाण्यामध्ये ऐश्वर्या सोबत अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघेसुद्धा होते.अभिषेक-ऐश्वर्या यांची ओळख वाढली. त्यानंतर आलेल्या गुरु, उमराव जान या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करू लागले. मात्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेमाची सुरुवात धूम टू या चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्यांच्याच लक्षात ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील खास नाते आले होते व या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिषेक ने ऐश्वर्याला लग्नासाठी मागणी घातली. ऐश्वर्या रायने  त्याला लागलीच होकार दिला.दोघांच्याही कुटुंबीयांनी या विवाहासाठी संमती दिल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर सुद्धा ऐश्वर्याने काही निवडक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवली. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत अतिशय सुखासमाधानाने संसार करत असून त्यांना आराध्या ही गोड मुलगी सुद्धा आहे.

२) चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडलेली अजून एक प्रसिद्ध जोडी म्हणजे ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार होय. बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. अक्षय कुमारच्या आयुष्यामध्ये ट्विंकल च्या अगोदर अनेक अभिनेत्री येऊन गेल्या होत्या मात्र ट्विंकल साठी त्याचे प्रेम हे इंटरनेशनल खिलाडी या दोघांनी एकत्र अभिनय केलेल्या चित्रपटाच्या दरम्यान बहरत गेले व पहिल्यांदाच आपल्या प्रेम संबंधांना विवाहाच्या नात्यात परावर्तित करण्याचा निर्णय अक्षय ने घेतला.

३) आपल्या अभिनय आणि निरागस सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री काजोल आणि आपल्या डँशिंग अभिनयाने ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगण या जोडीचे प्रेम सुद्धा हलचल या 1999 साली आलेल्या चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाले.या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय आणि काजोल एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र अतिशय बिनधास्त आणि बडबड्या स्वभावाची काजोल आणि अतिशय लाजाळू व शांत स्वभावाचा अजय यांच्यामधील प्रेम फार काळ टिकणार नाही असे त्यांच्याजवळच्या व्यक्तींना वाटत असे मात्र या सर्व दाव्यांना खोडून काढत  काजोल आणि अजय देवगण विवाहबंधनात अडकले व  आज पर्यंत त्यांचे नाते तसेच टिकून आहे.

४) बॉलीवूड मधील अभिनेत्री व क्रिकेट विश्वाचे  संबंध  खूप पूर्वीपासून जगजाहीर आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या आपापल्या क्षेत्रातील अगदी टॉप च्या जोडीची लव स्टोरी सुद्धा एका जाहिरातीच्या सेटवरच सुरू झाली होती. पहिल्यांदाच या जाहिरातीच्या सेटवर भेटलेल्या अनुष्का आणि विराट ला पहिल्या भेटीतच एकमेकांविषयी आकर्षण वाटले व हळूहळू त्यांच्यातील बोलणे ,भेटणे वाढू लागले.विराट आणि अनुष्का यांची जाहिरातीच्या सेटवर सुरू झालेली लव्ह स्टोरी विवाह मध्ये परावर्तित झाली आणि सध्या ही जोडी त्यांच्या येणा-या बाळाच्या आगमनासाठी चर्चेत आहे.

५) कपूर घराण्याची लाडकी बेबो अर्थातच करीना कपूर आणि पतोडी घराण्याचा वारस अभिनेता सैफ अली खान यांची ओळखही तशन या चित्रपटाच्या सेटवर झाली व या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे जण एकमेकांच्या प्रेमात अक्षरशः वेडे झाले. सैफ अली खान चा याअगोदर अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत विवाह झालेला होता व या दोघांना दोन मुले सुद्धा होती मात्र या विवाहामध्ये निर्माण झालेल्या विसंवादामुळे सैफ अली खान करीना कपूर कडे आकृष्ट झाला व त्याच्या या चित्रपटानंतर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर करीना आणि सैफ अली खान हे दोघे पती-पत्नीच्या नात्यामध्ये जोडले गेले व सध्या ते तैमूर या गोड मुलाचे आई-वडील म्हणून आपल्या जबाबदाऱ्या अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत आहेत.

६) बॉलीवूड मधील सध्याचे सर्व हॉट आणि बोल्ड कपल म्हणून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची पहिली भेट सुद्धा चित्रपटाच्या सेटवर झाली व  सर्वात प्रथम हे जोडी राम लीला या चित्रपटामध्ये एकत्र झळकली व त्यांच्यामधील केमिस्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पण लवकरच वर्तमानपत्रांमध्ये  त्यांची ही आँनस्क्रीन केमिस्ट्री आँफ स्क्रीन केमिस्ट्री मध्ये रूपांतरित झाल्याच्या बातम्या झळकू लागल्या व त्यांनी कधीही या गोष्टीला इन्कार केला नाही. यानंतर सुद्धा पद्मावत, बाजीराव मस्तानी,या चित्रपटांमध्ये रणवीर आणि दीपिका एकत्र झळकले .आपल्या प्रेमावर शिक्कामोर्तब म्हणून या जोडीने लवकरच घरच्यांच्या संमतीने काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह केला.

७) बॉलीवूड मधील एक आदर्श जोडपे म्हणून ओळखले जाणारे कपल म्हणजे जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख होय.रितेश देशमुख यांना त्यांचे दिवंगत वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे खूप मोठा राजकीय वारसा आहे यामुळे सुरुवातीला जेनेलियाचा रितेश यांच्याबद्दल काहीसा पूर्वग्रह झाला होता की रितेश एक गर्विष्ठ आणि बिघडलेला मुलगा असेल मात्र तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रितेश आणि जेनेलिया यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली. हा चित्रपट या दोघांचाही पदार्पणातील पहिलाच चित्रपट होता .या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतले .आज सुद्धा हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो याला कारण म्हणजे जेनेलिया आणि रितेश यांच्यामधील ऑन स्क्रिन केमिस्ट्री. पडद्यावर ही ऑन स्क्रिन केमिस्ट्री रंगात असतानाच रितेश आणि जेनेलिया यांच्यामधील प्रेम हे हळूहळू बहरत गेले .रितेश आणि जेनेलिया यांनी जवळपास नऊ वर्षे एकमेकांसोबत प्रेमसंबंधांमध्ये राहिल्यानंतर घरच्यांच्या संमतीने विवाह केला. लग्नानंतर जेनेलियाने चित्रपटांमध्ये अभिनय न करता आपले कुटुंब आणि कुटुंबातील सदस्यांना पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. या दोघांना दोन मुले असून देशमुख घराण्याची सून म्हणून जेनेलिया सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते व तिचे फँन फोलोअर्ससुद्धा खूप जास्त प्रमाणात आहेत.

beingmarathi

Related articles