या गोष्टी कधीही कोणाला ही देऊ नका ,नाहीतर होईल अनर्थ

आपण कधी -कधी अगदी सहजपणे एखाद्या शेजाऱ्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला काही गोष्टी उसने मागतो. किंवा काही वेळेसाठी वापरण्यासाठी वापरतो. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची वस्तु वापरतो , तेव्हा त्या व्यक्तिमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते असे मानले जाते. एकमेकांना साह्य जरूर करावे पण कोणत्या वस्तु द्याव्यात आणि किती द्याव्यात हे मात्र प्रत्येकाला समजायला हवे. अशा काही वस्तु आहेत ज्या आपण शक्यतो कोणालाही देऊ नयेत. आज आपण त्या वस्तु कोणत्या आहेत आणि त्या मागील करणे आहेत हे जाणून घेणार आहोत.
1 ) संध्याकाळच्या वेळेस कांदा आणि लसूण – असे म्हटले जाते संध्याकाळच्या वेळेस कांदा आणि लसूण जर कोणी उसने मागण्यास आले तर देऊ नये यामुळे असे होते की तुमच्या घरातील बरकत निघून जाते.
म्हणजेच काय तर तुमच्या घरातील सुबकता निघून जाते असे म्हटले जाते. त्यामुळे जर तुमचे शेजारी किंवा इतर कोणी जर कांदा किंवा लसूण मागण्यासाठी आले तर शक्यतो त्यांना ते देणे टाळा.
2 ) रुमाल – तुम्ही कोणाला कधी तुमचं रुमाल देत असाल तर सावधान ते देणे टाळा कारण जेव्हा तुम्ही तुमचा रुमाल एखाद्याला ऑफर करता तेव्हा तुमच्या दोघांमधील संबंध दुरावले जाऊ शकतात. पैशांवरून देखील वाद होऊ शकतात. पैसा हे देखील एक कारण ठरू शकते. तसेच आरोग्याचा देखील विचार केला तर आपला रुमाल कोणालाही देऊ नये. त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते.
3 ) उधारी – कोणला उधार देखील देऊ नये , आणि कोणाकडून उधार देखील घेऊ नये. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. संध्याकाळच्या वेळेत तर नक्कीच कोणाला उधार देऊ नये. असे म्हटले जाते उधार दिल्यामुळे लक्ष्मी निघून जाते. उधारीमुळे अनेक चांगले चाललेले व्यवसाय देखील बंद पडतात.
4 ) दागिने – दागिने हा महिलांचा अगदीच आवडीचा विषय. महिला आपल्या कपड्यांशी जाणारे दागिने एकमेकींचे अगदी हौशीने घालतात पण यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. ग्रह दशा देखील बदलू शकते. त्यामुळे दागिने तर शक्यतो घालूच नये. सोन्याचे दागिने तर घालणे शक्यतो टाळावे. कारण हरविले , तुटले तर ती जास्त रिस्क असते.
5 ) मीठ – जर तुम्हाला संध्यायकळच्या वेळेत मीठ मागण्यास आले तर सरल नाही म्हणून सांगा कारण मीठ दिल्यामुळे लक्ष्मी नाराज होते. असे म्हटले जाते. मिठास लक्ष्मी म्हटले जाते आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेत मीठ देऊ नये. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. अनेकदा काही गोष्टिना आपल्याला नकार देता येत नाही पण आपण आपल्या चांगल्या भविष्यासाठी काही गोष्टीना नाही म्हणावे.
6 ) पेन – अनेकदा आपण कोणाकडून पेन घेतो आणि तो परत देखील करत नाही. शक्यतो आपण आपला पेन जवळ बाळगायला हवा या बरोबरच कोणी जर आपल्याला पेन मागितला तर शक्यतो नाही म्हणावे. कारण तुम्हाला पैशांची तंगी येऊ शकते या बरोबरच तुमच्या आत्मसन्मानास ठेस पोहचू शकते.
7 ) घडयाळ – शक्यतो दुसऱ्यांचे घडयाळ वापरू नये. असे म्हटले जाते की जर आपण दुसऱ्याचे घडयाळ वापरले तर आपल्यावर देखील तीच वेळ येते. त्यामुळे शक्यतो दुसऱ्याचे घडयाळ वापरू नये.