एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या आणि केसांचे आरोग्य जपा!

एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या आणि केसांचे आरोग्य जपा!

आपला आहार आणि विहार आपल्या शरीरावर परिणाम करत असतो यापैकी एक बाब पटकन जाणून येते ते म्हणजे आपले गळणारे केस केस गळायला लागला नंतर आपल्याला सगळ्यात जास्त जाणवायला लागतो तो आपल्या सौंदर्याच्या बाबतीत आपले केस म्हणजे आपल्या सौंदर्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतात यांच्या आरोग्य जपण्यासाठी अनेक सल्ले दिले जातात त्यापैकी एक सल्ला असतो तो म्हणजे एरंडाचे तेल लावणे परंतु हे तेल लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्यानुसार ते लावले गेले तर केसांची वाढ आणि गळणे यावर परिणाम दिसू शकतो जाणून घेऊया तीच पद्धत

एरंडेल तेल केसांना सरळ लावण्यापेक्षा त्यामध्ये कोरफडीचा रस एकत्र करून तीस-चाळीस मिनिटे ते मिश्रण केसांना लावून ठेवल्याने आणि नंतर केस धुतल्याने चांगला परिणाम जाणवू शकतो

अनेक जण एरंडेल तेल कोरफडीचे तेल आणि टी ट्री ऑइलचे 3-4 थेंब एकत्र करुन लावतात. यामुळे एरंडेल तेलाचे, कोरफडीचे आणि टी ट्री ऑइल चे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरतात. हे तेल गरम लावल्याने आपल्या केसांच्या मुळांना शक्ती प्रदान होते.

एरंडेल तेल, बदामाचं तेल, नारळाचं तेल,ऑलिव्ह ऑइल हे चारही तेल एकत्र करून, मंद आचेवर गरम करा. शितल थंड झाल्यानंतर एका बाटलीत भरून ठेवा आणि आठवड्यातून तीन-चार वेळा तेल लावण्याची काळजी घ्या त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका.

Being Marathi