‘या’ जोडप्याने जंगलामध्ये केले चक्क अर्धनग्नावस्थेत वेडिंग शूट, फोटो व्हायरल झाल्यानंतर…

‘या’ जोडप्याने जंगलामध्ये केले चक्क अर्धनग्नावस्थेत वेडिंग शूट, फोटो व्हायरल झाल्यानंतर…

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना मानला जातो.या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत रहावे असे तरुणाईची इच्छा असते व त्यातूनच अनेक भन्नाट कल्पना व शक्कल लढवल्या जातात. यासाठी अनेकदा अगदी टोकाचे स्टेटस, फोटोज, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. या व्हिडीओज ला, फोटो ला ,पसंती तर मिळते पण अनेकदा हे फोटो ,व्हिडीओ काही वेगळ्याच कारणाने व्हायरल होतात आणि यामुळे संबंधित व्यक्तींना मनस्तापाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते .

मात्र अशी वाईट प्रसिद्धी सुद्धा अनेकांना हवीहवीशी वाटते .सध्याच्या जमान्यात आपल्या आयुष्यातील विशेष क्षणांना फोटोशूट च्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून कायम अविस्मरणीय आणि जिवंत ठेवण्याचा ट्रेंड वाढत आहे. यातूनच लग्न हे तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय सोहळा असते. म्हणूनच प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग फोटोशूट सारख्या संकल्पना साकार होत आहेत.

प्री वेडिंग शूट किंवा पोस्ट वेडिंग शूट साठी संबंधित जोडपे नयनरम्य अशा ठिकाणी एकमेकांसोबत रोमँटिक पोजमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूट करतात. यासाठी वेगवेगळ्या ड्रेस,थीमचा वापर केला जातो. मात्र या सर्वांवर कडी करत नुकतेच एका जोडप्याने आपले पोस्ट वेडिंग शूट केले आहे ज्यामध्ये यांनी सर्व सीमा पार करत केरळच्या जंगलामध्ये एकमेकांसोबत न्यूड फोटोशूट केले आहे व हे फोटोशूट अवघ्या काही तासांमध्ये प्रचंड व्हायरल झाले.

यावर अनेकांनी चांगल्या कमेंट केल्या मात्र मोठ्या प्रमाणात ट्रॉलर्सने या फोटोशुटला नापसंती दर्शवली. मात्र या कपलला या सर्वांची कोणतीही फिकीर नसून हे फोटोशूट आपण सोशल मीडियावरून डिलीट करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.अशाप्रकारे हे अर्ध नग्नावस्थेतील पोस्ट वेडिंग शूट करणारे चर्चेत आलेले कपल म्हणजे एर्नाकुलम येथील ऋषी आणि लक्ष्मी हे आहेत .

ऋशी आणि लक्ष्मी यांचे लग्न लॉकडाउनच्या काळामध्ये झाले. कोरोनामुळे हा विवाह त्यांना अतिशय साधेपणाने आणि मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत करावा लागला.लग्नाच्या आधीपासून एकमेकांना डेट करत असलेल्या या जोडप्याला त्यामुळे आपल्या विवाहाची फारशी मजा अनुभवता आली नाही. म्हणूनच आपल्या विवाह सोहळ्याला अधिक अविस्मरणीय बनवण्यासाठी त्यांनी या अनोख्या पोस्ट वेडिंग शूटचा आधार घेण्याचे ठरवले. ही संकल्पना त्यांना नेटवरून मिळाली.

आपल्या एका फोटोग्राफर मित्राच्या मदतीने त्यांनी येथील चहाच्या मळ्यांमध्ये हे फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये हे दोघे जण केवळ एका पांघरुणात च्या आत मध्ये असून वेगवेगळ्या रोमॅंटिक पोजमध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये पहुडलेले दिसताहेत. या छायाचित्रांमुळे आपल्या भारतीय संस्कृतीवर गदा येत आहे व कुठेतरी एक चुकीचा संदेश तरुणाईला पोहोचत आहे असे काही युजर्सचे म्हणणे आहे.

मात्र हे फोटोशूट करण्याचा निर्णय आमचा वैयक्तिक असून हे फोटोज व्हायरल करणे सुद्धा आमचा वैयक्तिक निर्णय आहे व त्यामुळे सोशल मीडिया वरून हे फोटो आम्ही हटवणार नाहीत अशी ठाम भूमिका या जोडप्याने घेतली आहे. मात्र या फोटोशूट मुळे वाईट मार्गाने का होईना पण हे कपल चांगलेच लोकप्रिय झाले.आहेत. ऋषी आणि लक्ष्मी हे पेशाने अभियंता आहेत. ऋषी आणि लक्ष्मी यांच्यामध्ये हे फोटोशूट केवळ त्यांच्या वैयक्तिक नात्यामधील प्रेम आणि मजा दाखवण्यासाठी करण्यात आले होते.

लग्नानंतरची पती-पत्नीमधील जवळीक टिपणे  हा या फोटोशूट मागचा उद्देश होता. यामागे कोणाच्याही सामाजिक जाणिवांना धक्का पोचविण्याचा उद्देश नव्हता व त्यामुळेच हे फोटोज आम्ही हटवणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.मात्र या फोटोशूटला सोशल मीडिया वरती व्हायरल झाल्यावर लक्ष्मी आणि ऋषीच्या बद्दल व त्यांच्या कुटुंबियां बद्दल अनेक अश्लील कमेंट युजर्सनी केल्या. याला घाबरून त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्र-मैत्रिणी नीही त्यांना हे फोटो काढून टाकण्यास सांगितले होते.

beingmarathi

Related articles