Articles Entertainment Uncategorized

म्हणून अशोक सराफ शर्टाची पहिली दोन बटणे लावत नसत , जाणून घ्या काय आहे कारण ?

Sharing is caring!

अशोक सराफ मराठी चित्रपट विश्वातील एक नावाजलेले नाव. मराठीच काय अगदी हिंदी चित्रपट क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे/ प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे . आज देखील अशोक सराफानचा कोणता ही चित्रपट लावा , तुम्ही नक्की खळखळून हसणारच. अशी ही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रम्हचारी, आयत्या घरात घरोबा असे अनेक चित्रपट अशोक सराफाचे गाजले ,आज देखील आवडीने पाहिले जाते. अशोक सराफाना सर्वजण मामा म्हणून ओळखतात. अशोक मामांच्या सर्व चित्रपटांचे निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येते , की अशोक मामा शर्टाच्या वरची दोन बटणे लावत नाहीत. आज आपण जाणून घेणार आहोत अशोक सराफ शर्टाची दोन बटणे का लावत नाहीत.

अशोक सराफाच्या शर्टाची दोन बटणे उघडी ठेवणे ही त्यांची स्टाईल समजली जाऊ लागली आहे, या बाबत खुद अशोक सराफ यांनी खुलासा केला आहे. ते सांगतात करीयरच्या सुरवातीच्या काळत, तेव्हा शर्टाची पहिली दोन बटणे उघडी ठेवणे अशी फॅशन होती, दुसर कारण म्हणजे शर्टची सगळी बटन लावली की खूप अवघडल्या सारख होत त्यामुळे मी शर्टाच्या वरची दोन बटणे लावत नसत. यामागे विशेष वगैरे काही कारण नाही.

अशोक मामा चित्रपट क्षेत्रात येण्याच्या अगोदर ते एका बँकेत कामाला होते. परंतु चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळा आणि बँकेची वेळ जुळून येत नसे , त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना देखील त्रास होत त्यामुळे अशोक सराफानी बँकेतील नोकरी सोडून दिली. आणि चित्रपटात पूर्ण वेळ काम करायला सुरवात केली. अशोक सराफ , महेश कोठारे , लक्ष्मीकांत बेर्डे या तीन जणांच्या जोडीने अनेक चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. आज देखील कित्येक चित्रपट आवडीने पाहिले जातात