करोंना महामारीमुळे सर्वत्र एकच आहाहा माजला होता. देशात अचानक लॉक डाऊन करावे लागले . सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेक मंजूर पायी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पायी चालत गेले. अनेक अन्नावचून भुकेने मेले अनेकांनी मदतीचे हात पुढे केले पण एक चेहरा मात्र लागेल त्याला , लागेल ती मदत करत होता. हा चेहरा आहे बॉलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सुद होय.

सोनूने अनेक मजुरांना अनेक कष्टकरी लोकांना , अनेक शेतकरी लोकांना अगदी मोकळ्या मनाने मदत केली. अनेक मजुरांना त्याच्या गावी परत जाता यावे यासाठी वाहनाची सोय केली. फूड पॅकेटस वाटले. अशा प्रकारे सोनूने लागले ती मदत केली. लोकांनी देखील सोनूच्या या मदतीचे तोंड भरून कौतुक केले. पण अनेकांनी सोनूकडे इतके पैसे कुठून आले ? हा एक प्रश्न देखील उपस्थित केला. सोनू हा चित्रपटात काम करतो , पण तो सहाभिनेता म्हणून काम करतो त्यामुळे त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले असा प्रश्न पडणे अगदी सहाजिकच आहे. अनेकांनी सोनूला कोणती तरी राजकीय पार्टी मदत करत आहे , असा अंदाज देखील व्यक्त केला होता. पण त्या बाबीत देखील इतके तथ्य नव्हते.

सध्या एक सत्य समोर येत आहे. ते असं की सोनू ने मदत करण्यासाठी त्याची स्वतच्या मालकीची प्रॉप्रटी गहाण ठेऊन त्यावर कर्ज काढले आहे. मनी टाइम्सच्या बातमी नुसार सोनूने त्याची मुंबईतील काही प्रॉपर्टी बँकेत गहाण ठेवून तब्बल 10 कोटी रुपये इतके कर्ज काढले आहे. या बाबत सोनूकडून कोणताही खुलासा करण्यात आला नसून. माहितीनुसार मुंबईतील एकूण 6 फ्लॅट आणि दोन दुकाने त्यांनी गहाण ठेवली आहेत. एकूण आठ मालमत्ता त्याने गहाण ठेवल्या आहेत. या सर्व जागा मुंबईतील जुहू येथील आहेत.

शिवसागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत तील फ्लॅट आणि नायर रोडवरील दुकाने त्यांनी गहाण ठेवली आहेत. ही सर्व मालमत्ता त्याच्या पत्नीच्या नावे आहे. हे 10 कोटीचे कर्ज घेण्यासाठी त्यांनी तब्बल 5 लाख नोंदणी शुल्क भरले आहे. अशा प्रकारे सोनूने अगदी कर्ज काढून गरजूना मदत केली आहे.
शब्द संख्या – 300