गर्भावस्थेदरम्यान या कारणामुळे गळतात केस… जाणून घ्या त्यावरील उपाय!

गर्भावस्थेदरम्यान या कारणामुळे गळतात केस… जाणून घ्या त्यावरील उपाय!

मूल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली; आणि प्रत्येक स्त्रीला आई व्हावे असे वाटत असले तरीदेखील, ही प्रक्रिया आणि त्यातून होणारी शरीराची झीज भरून यायला देखील बराच वेळ लागतो.

यात शरीराची झीज जास्त होते. त्याच बरोबर सौंदर्याच्या दृष्टीने देखील स्त्रीमध्ये बरेच बदल होतात. त्यापैकी एक बदल हा म्हणजे स्त्रीचे या दरम्यान बरेच केस गळतात. अनेक जणींना या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल. आज आपण जाणून घेणार आहोत या समस्येची कारणे आणि उपाय!

केस गळणे हे प्रत्येक स्त्रीमध्ये होते असे नाही. मात्र, काही स्त्रियांमध्ये थायरॉइड संप्रेरकाची कमतरता याला कारणीभूत ठरू शकते. गर्भावस्थेत दरम्यान थायरॉईड संप्रेरकाचे शरीरात कमी होणे, स्त्रियांचे केस गळतीचे कारण ठरते.

अनेक स्त्रियांना गर्भावस्थेत दरम्यान व्यवस्थित झोप मिळत नाही किंवा रात्रीची झोपच लागत नाही. अशा वेळी हॉर्मोन्स बदलत राहतात, आणि त्याचा शरीरावर किंबहुना केसांवर जास्त परिणाम होतो आणि केस गळती सुरू होते.

अनेक स्त्रियांना सुरू असणारी औषधे त्यांच्या शरीरावर परिणाम करतात. या दुष्परिणामांमुळे अनेकदा शरीरात बदल घडतात आणि हे बदल फार चांगले नसतात. यामध्ये केस गळणे ही एक समस्या उद्भवते, आणि त्यानंतर ती समस्या कमी करणे अवघड होत जाते.

अनेक स्त्रियांमध्ये पोषणाची कमतरता असते. कारण, पोटात असणारे बाळ आणि ती आई त्या दोघांना मिळून लागणारे पोषण हे जास्त असते. काही स्त्रियांना गर्भावस्थेदरम्यान जेवणावर इच्छा होत नाही. त्यामुळे, योग्य पोषण त्यांच्या शरीरात जात नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसायला लागतो. यामध्ये दृश्यपरिणाम केस गळती असू शकतो.

याचे उपाय अगदी सोपे आणि घरगुती आहेत. कोरफड आणि मेथ्या एकत्र करून काही दिवस ठेवले, त्यानंतर त्यात तेलामध्ये उकळून त्याचे तेल तयार केले, आणि ते तेल केसांना लावले तर काही महिन्यातच ही समस्या कमी होऊ शकते.

एरंडेल तेल, कोरफड, टी ट्री ऑइल याचे मिश्रण करून ते थोडावेळ गरम तेलात उकळल्याने आणि नंतर केसांना लावून केस धुतल्याने लवकर परिणाम जाणवतो. केस गळती सोबतच कोंडा कमी करण्यासाठी देखील ही गोष्ट आवश्यक असते. मात्र, कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या केस गळती मागे नेमके कारण कोणते आहे हे जाणून घ्या. तज्ञांचा सल्ला घेऊनच या उपायांची अंमलबजावणी करा.

Being Marathi