Celebrities Entertainment Uncategorized

सुशांतविषयी नवाजुद्दीनने दिली महत्वाची माहिती! सुशांत प्रकरणावर पहिल्यांदाच बोलला नवाजुद्दीन

Sharing is caring!

सुशांतविषयी नवाजुद्दीनने दिली महत्वाची माहिती! सुशांत प्रकरणावर पहिल्यांदाच बोलला नवाजुद्दीन

सुशांतच्या अचानक जाण्याने त्याच्या फॅन्सना खूप मोठा धक्का बसला आणि त्यातून ते अजूनही सावरले नाहीत. नवाजुद्दीन हा सुद्धा एक बॉलिवूडच्या बाहेरून आलेला स्टार आहे. बॉलिवूडबाहेरील माणसाला बॉलिवूडमध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. मात्र, काही कलाकार असे असतात जे आपले नाव इतिहासात कोरतात. नवाजुद्दीन आणि सुशांत असेच कलाकार आहेत.

सध्या सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपण्यात आला आहे. यामध्ये सीबीआय सुशांतची हत्या झाली आहे की त्याने स्वतः आयुष्य संपवले याचा तपास करतेय. तर सुशांत आयुष्य संपवण्यासारखं मोठं पाऊल कसा उचलू शकतो अशा प्रश्न अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने उपस्थित केला आहे. त्याने एका माध्यमाला मुलाखत देताना या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त केले आहे कि, “एका तरुण आणि जगण्याची उमेद असणाऱ्या व्यक्तीने आयुष्य संपवले असेल यावर विश्वास बसत नाही.”

“सुशांत आयुष्य भरभरून जगायचा. तो स्वतः फार बोलका होता शिवाय इतरांना बोलकं कसं करायचं हे त्याला माहिती होतं. मी त्याला अनेकदा भेटलोय. आम्हा दोघांनाही एकमेकांचं काम फार आवडायचं. त्याच्याशी भेट झाली की मला एक वेगळी सकारात्मक उर्जा सभोवती जाणवायची. त्याने आयुष्य संपवले यावर माझा विश्वास नाही. आयुष्याला कंटाळून तो असा निर्णय घेऊ शकतो?” असे देखील तो पुढे म्हणाला.

“माझ्या मताप्रमाणे पैसा ही सुशांतसाठी दुय्यम गोष्ट होती. त्याच्या सिनेमांची निवड मला फार आवडायची. तो खूप मोठा स्टार होता. यानंतरही त्याने अनेक चांगल्या ब्लॉकबस्टर सिनेमांची निवड केली असती याची मला खात्री आहे. तो एक चांगला आणि सच्चा कलाकार होता” असे नवाजुद्दीनने सांगितलं. सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे आहे आणि लवकरच त्यातून सत्य जगापुढे येईल अशी आशा सर्वांना आहे.