चांगल्या आरोग्यासाठी कोणते तेल रोजच्या जेवणात वापरावे

आपण दररोज स्वयंपाक बनवतो/ स्वयंपाक बनविताना तेलाचा वापर तर अनिवार्य आहेच , म्हणजेच काय तर कमीत कमी तेल जरी वापरुन स्वयंपाक करायचे ठरविले तरी तेल हे वापरावेच लागते. अनेकांना प्रश्न पडतो , मग तेल कोणते वापरावे . कारण आपण कोणते तेल वापरतो यावर संपूर्ण घराचे आरोग्य अवलंबून असते. तेल कोणते वापरावे किती वापरावे ह्या विषयी समज -गैरसमज आहेत आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. चंगल्या आरोग्यासाठी आपण रोजच्या जेवणात कोणते तेल वापरावे. आपण जर संपूर्ण भारताचा विचार केला असतं आपल्या लक्षात एक गोष्ट येते , ती अशी की प्रत्येक प्रदेशावर तेलाचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारचा केला जातो. आता हेच पहा ना दक्षिण भारतात खोरबरेल तेलाचा तर उत्तर भारतात मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. तर इतर म्हणजेच संपूर्ण भारतात शेंगदाणा तेलाचा वापर सर्वाधिक केला जातो. देशात सर्वाधिक भुईमूग , सोयाबीन , सूर्यफूल यांचे उत्पादन घेलते जाते. त्या पाठोपाठ करडई , मोहरी यांचे उत्पादन घेलते जाते. तेल आणि तेल बिया यापासून जे तेल बनविले जाते त्याचे संपूर्ण गुणधर्म त्या तेलात उतरले जातात.
शेंगदाणा तेल – शेंगदाणा तेल हे भुईमुगापासून बनविले जाते. या तेलास गोडेतेल देखील म्हटले जाते. या तेलामध्ये भरपूर जीवनस्तत्वे असतात. अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. या बरोबरच कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यासाठी शेंगदाणा तेल अतिशय उपयुक्त आहे.
सूर्यफूल तेल – सूर्यफूल हे तेल बियांपासून बनलेले असते . या तेलामध्ये भरपूर जीवनस्तत्वे असतात. हे तेल आरोग्यासाठी खूप हितकारक असते.
सोयाबीन तेल – हे तेल सोयाबीनच्या बियांपासून बनते. सूर्यफुलाच्या खालोखाल या तेलाचा वापर केला जातो. या तेलात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. आरोग्यासाठी हे तेल देखील हितकारक असते. अलीकडे या तेलाचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे.
राइस ब्रॉन ऑइल – हे तेल भाताच्या कोंड्यापासून बनविलेले असते. यामध्ये ई जीवनसत्त्व आणि ॲंटी-ऑक्सिडेंट प्रमाण अधिक असते. हे तेल आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हे प्रतिकार शक्ति वाढवते. ज्या लोकांच्या शरीरात साखरेचे प्रमाण अधिक असते , अशा लोकांसाठी हे तेल खूप उपयुक्त असते.
तिळाचे तेल- तिळाचे तेल खाण्यासाठी आरोग्यासाठी खूप चांगले असते. या तेलामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. हात – पायांची मालीश करण्यासाठी हे तेल अधिक प्रमाणात वापरतात. थकवा घालवण्यासाठी देखील हे तेल अतिशय उपयुक्त असते.
करडई तेल – हे तेल मधुमेहाच्या त्रास असलेल्यासाठी हे तेल अतिशय उपयुक्त आहे. या तेलाच्या वापरामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. हे तेल शरीरातील साखरेचा स्तर कंट्रोलमध्ये ठेवते. परंतु ह्या तेलाचे सेवन हे प्रमाणातच करावे.
मोहरी तेल – हे तेल उत्तर भारतात वापरले जाते . कारण या तेलामध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे थंड प्रदेशात हे तेल आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. मोहरीचे तेल शरीरात उष्णता निर्माण करते.
खोबरेल तेल – महाराष्ट्रात हे तेल केसांना लावण्यासाठी वापरतात,पण दक्षिण भारतात हे तेल खाण्यासाठी वापरतात.आता आपण तेलाचे प्रकार पाहिले. त्यामध्ये कोणते पोषक तत्वे असतात ते देखील पाहिले परंतु तेल कोणते वापरावे , ते किती प्रमाणात वापरावे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर हे देखील कमीत कमी तेलाचा वापर करण्याचा सल्ला देतात.सगळ्याच तेलात फॅट असतात पण ज्या तेलात एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन्स असतात अशा तेलाचा वापर करावा. शेंगदाणा तेल , सूर्यफूल तेल , राईस ब्रॉन ऑइल यासर्वांचा आलटून – पालटून वापर करावा. एकच तेल खूप दिवस वापरू नये. घाण्यावरच्या तेलाचा अधिक -अधिक वापर करावा. सर्व तेलांचा आलटून पालटून वापर केल्यामुळे शरीराला देखील वेगवेगळी प्रथिने मिळतात. ‘अति वर्जते’ या म्हणीप्रमाणे भाजी आणि आमटी यामध्ये कमीत – कमी तेलाचा वापर करावा. एकदा तळून झाल्यानंतर तेलाचा वापर पुन्हा – पुन्हा करू नये.